
Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजारात आज (19 ऑगस्ट) सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सकारात्मक जागतिक संकेत, ऑटो शेअर्समध्ये खरेदी आणि रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांच्या वाढीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 370 अंकांनी वाढून 81644.39 वर, तर निफ्टी 50 निर्देशांक 103.70 अंकांनी वाढून 24980.65 वर बंद झाला.