
Stock Market Closing Today: आज शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण होते. सेंसेक्स 90 अंकांनी वाढून 83,697 वर बंद झाला. निफ्टी 24 अंकांनी वाढून 25,541 वर बंद झाला. बँक निफ्टीत 146 अंकांची वाढ झाली. तो आता 57,459 च्या पातळीवर बंद झाला.
आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग क्षेत्रात खरेदी दिसून आली. HDFC Bank, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank यांचे शेअर्स वधारले. बँक निफ्टीतील वाढीमुळे बाजारात तेजी दिसून आली.