
Why Stock Market Crash: भारतात एचएमपीव्ही विषाणूचा रुग्ण आढळला आहे. अशा परिस्थितीत हा विषाणू शेअर बाजारालाही बुडवेल की काय अशी भीती शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे. एचएमपीव्ही विषाणूच्या पहिल्या रुग्णाच्या वृत्तानंतर आज भारतीय शेअर बाजारात ज्या प्रकारे घसरण झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की अशा परिस्थितीत काय करावे जेणेकरून त्यांचा पैसा बुडणार नाही.