
Why Stock Market Crash Today: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता शेअर बाजारावरही दिसून येत आहे. 8 मे रोजी बाजार घसरणीसह बंद झाला. बाजार बंद झाल्यानंतर, पाकिस्तानने काही भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे, गुंतवणूकदारांच्या मनात शेअर बाजाराबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.