
Stock Market Closing Today: शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 700 अंकांनी वाढून 82,755 वर बंद झाला. निफ्टी 200 अंकांनी वाढून 25,244 वर बंद झाला. बँक निफ्टी 159 अंकांनी वाढून 56,621 वर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर, खाजगी बँका वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली.