

Stock Market Holiday: आज (गुरुवार, 10 एप्रिल) देशांतर्गत शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. देशातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) आज बंद राहतील. एनएसई हॉलिडेज लिस्ट 2025नुसार, श्री महावीर जयंतीमुळे शेअर बाजारात सुट्टी आहे.