share market
share market sakal

Stock Market Holiday: आज शेअर बाजार राहणार बंद; 2023 मधील सर्व सुट्ट्यांची यादी पाहा

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आज म्हणजेच 29 जून (गुरुवार) बकरी ईद निमित्त बंद राहतील.

Stock Market Holiday: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आज म्हणजेच 29 जून (गुरुवार) बकरी ईद निमित्त बंद राहतील. आज, या दोन्ही एक्सचेंजेसवर शेअर्सची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. यापूर्वी बकरी ईद निमित्त देशांतर्गत शेअर बाजार बंद राहणार होता.

एक्सचेंजेसवर 28 जून (बुधवार) रोजी शेअर बाजार बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पण नंतर ते बदलून गुरुवार म्हणजेच 29 जून करण्यात आली आहे. कमोडिटी आणि फॉरेक्स मध्ये, बकरी ईद निमित्त सुट्ट्यांचे अपडेट आले आहे.

बुधवारी बाजार उघडल्यानंतर रेकॉर्डब्रेक तेजी पाहायला मिळाली. या दिवशी, निफ्टीने 154.70 अंकांची म्हणजेच 0.82% वाढ नोंदवली आणि हा निर्देशांक 18,972.10 च्या पातळीवर बंद झाला.

त्याचप्रमाणे, सेन्सेक्स देखील 499.39 अंकांच्या म्हणजेच 0.79% च्या वाढीसह 63,915.43 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी, सेन्सेक्स आणि निफ्टी बँक बुधवारी बाजारात नवीन विक्रमी पातळी गाठण्यात यशस्वी झाले. निफ्टीने पहिल्यांदाच 18,900 चा टप्पा ओलांडला, तर सेन्सेक्सनेही पहिल्यांदा 64,000 चा टप्पा ओलांडला.

मल्टी कमोडिटी बाजारही बंद आहे का?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर आज म्हणजेच 29 जून, गुरुवार रोजी सकाळच्या सत्रात कामकाज बंद राहील. मात्र सायंकाळच्या सत्रात कामकाज सुरू राहणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर संध्याकाळचे सत्र 5 ते 11 किंवा रात्री 11:55 पर्यंत असते.

या बदलाची माहिती MCX ने दिली आहे. यापूर्वी, 28 जून रोजी ट्रेडिंग सत्रात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत या एक्सचेंजवर व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Stock Market Holiday List
Stock Market Holiday ListSakal

2023 मध्ये शेअर बाजार आणखी कोणत्या दिवशी बंद राहणार?

याशिवाय 15 ऑगस्ट (मंगळवार) 2023 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. ऑगस्टनंतर म्हणजे 19 सप्टेंबर (मंगळवार) गणेश चतुर्थी, 2 ऑक्टोबर (सोमवार) रोजी महात्मा गांधी जयंती, 24 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी दसरा, 14 नोव्हेंबर रोजी दिवाळी, 27 नोव्हेंबर (सोमवार) गुरु नानक जयंती आणि 25 डिसेंबर (सोमवार) नाताळच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com