
शेअर बाजारात घसरण झाली असून सेंसेक्स 72 अंकांनी खाली गेला आहे.
निफ्टी 24,650च्या खाली ट्रेड करत आहे.
आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.
Stock Market Opening Today: शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला दिसलेली तेजी मंगळवारी ओसरताना दिसली. बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सेंसेक्स 72 अंकांनी घसरून 80,946 वर उघडला, तर निफ्टी 2 अंकांनी घसरून 24,720 वर स्थिरावला. बँक निफ्टीतही 74 अंकांची घसरण झाली आणि तो 55,545 वर उघडला.
आज बाजारात सेक्टोरल इंडेक्समध्येही दबाव पाहायला मिळाला. ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्रांमध्ये जोरदार विक्री झाली. मात्र, निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक थोड्या वाढीसह व्यवहार करताना दिसला.