
Stock Market Opening Today: आज शेअर बाजारासाठी निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे आणि बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या वेळी निफ्टी 100 अंकांनी वाढून 24,860 वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स 450 अंकांनी वाढून 81,751च्या आसपास होता. बँक निफ्टी देखील 250 अंकांनी वधारला होता.
अमेरिकेतून येणाऱ्या दरवाढीच्या बातम्यांमुळे आयटी आणि मेटल शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टीवरील आयटी निर्देशांक 1 टक्क्यांच्या वर होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जबरदस्त वाढ झाली.