
आजच्या व्यवहारात ऑटो, मेटल आणि पीएसयू बँक इंडेक्स वाढले, तर इन्फोसिस, HDFC लाईफसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली.
गुंतवणूकदारांचे लक्ष GST काऊन्सिलच्या बैठकीवर असून करकपात आणि दर सुधारणेची शक्यता आहे.
सोने-चांदी नव्या उच्चांकावर पोहोचले असून रशियाकडून तेलावरील डिस्काउंटमुळे भारताला दिलासा मिळणार आहे.
Stock Market Opening Today: आज बुधवारी शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला, परंतु त्यानंतर बाजार वरच्या पातळींवरून घसरला. सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला. निफ्टीमध्येही सुमारे 40 अंकांनी वाढ झाली. बँक निफ्टी, मिडकॅप निर्देशांकातही वाढ दिसून आली. त्यानंतर सेन्सेक्स 130 अंकांनी घसरला. निफ्टी देखील 34 अंकांच्या घसरणीसह 24,545च्या आसपास व्यवहार करत होता.