
DIIs च्या मोठ्या खरेदीमुळे आणि FIIs च्या कमी विक्रीमुळे बाजारात तेजी.
सोन्या-चांदीने विक्रमी वाढ करत भारतीय गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.
Titan च्या आंतरराष्ट्रीय डीलसह अनेक कंपन्यांच्या निकालांवर बाजाराची नजर.
Stock Market Opening Today: आज (मंगळवारी) शेअर बाजारात जोरदार तेजीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्सने 327 अंकांच्या वाढीसह 82,527 वर व्यापारास सुरुवात केली. निफ्टीही 76 अंकांनी वाढत 25,166 वर उघडला, तर बँक निफ्टी 301 अंकांनी वाढून 57,253 वर पोहोचला.