

Stock Market Opening Latest Update: तेजीसह उघडल्यानंतर शेअर बाजार लगेचच लाल रंगात व्यवहार करू लागला. सेन्सेक्स 76 अंकांच्या वाढीसह 75,996.86 वर उघडला, तर निफ्टी 4 अंकांच्या किंचित वाढीसह 22,963 वर उघडला. सोन्याच्या दरातही किंचित वाढ दिसून आली.
सकाळी सोने 317 रुपयांनी वाढून 85,372 रुपयांवर पोहोचले. मात्र, निफ्टीच्या आयटी निर्देशांकात वाढ दिसून येत आहे. तर मेटल, फायनान्स, एफएमसीजी या प्रमुख क्षेत्रांचे निर्देशांक घसरले आहेत.