
Stock Market Opening Today: गुरुवारी (12 जून) निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात सपाट सुरुवात झाली. बाजार लाल आणि हिरव्या रंगात चढ-उतार करताना दिसत आहे. सेन्सेक्स 70 अंकांनी घसरला.
त्याच वेळी निफ्टी 20 अंकांनी घसरला. बँक निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांकही घसरले. यानंतर, बाजार हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसला. आज निफ्टीवरही फार्मा शेअर्समध्ये खरेदी झाली. परंतु आयटी शेअर्स घसरताना दिसत होते.