

Stock Market Opening Today: आज पुन्हा एकदा शेअर बाजारात तेजी दिसत आहे. सेन्सेक्स 312 अंकांनी वाढून 78,296 वर उघडला. निफ्टी 93 अंकांच्या वाढीसह 23,751 वर उघडला. बँक निफ्टीमध्येही आज खरेदी दिसून आली. तो 170 अंकांनी वाढून 51,874 वर उघडला आहे.
आज सुरुवातीच्या व्यवहारात रिअल्टी क्षेत्राच्या निर्देशांकात सर्वाधिक खरेदी दिसून आली. तो 1.7 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
कालप्रमाणे आजही बाजारातील जवळपास सर्वच क्षेत्रांच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी फार्मापासून ते ऑटो, मेटल आणि एफएमसीजीपर्यंत सर्व निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.