
निफ्टीवर टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज, टाटा कंझ्युमर आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी, तर ट्रेंट, कोटक बँक, टेक महिंद्रा आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण.
अमेरिकन बाजारांनी नवे विक्रमी उच्चांक गाठले; नॅस्डॅक 21,000 च्या वर.
चांदीने 1,16,641 रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला; सोने 1 लाखाच्या खाली घसरलं.
Stock Market Opening Today: आज भारतीय शेअर बाजारात निफ्टीची विकली एक्सपायरी असल्याने सुरुवातीला बाजारात मिश्र कल दिसून आला. बाजाराने सकाळी सपाट ओपनिंग केल्यानंतर थोड्याच वेळात लाल रंगाकडे वाटचाल सुरु केली.