
थोडक्यात:
सेन्सेक्स 30 अंकांनी वाढला, तर निफ्टी 25,000च्या खाली आहे
रिलायन्सच्या नफ्यात वाढ असूनही शेअर 2% नी घसरला; बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये वाढ दिसली.
ऑटो, ऑईल अँड गॅस, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रात अर्धा टक्का घसरण झाली; रुपया डॉलरच्या तुलनेत 86.21 वर उघडला.
Stock Market Opening Today: आज (सोमवार, 21 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराने थोड्या तेजीसह ट्रेडिंगला सुरुवात केली. मात्र, सुरुवातीच्या वाढीनंतर बाजार स्थिर झाला आणि नंतर सपाट पातळीवरच व्यवहार करताना दिसला. सेन्सेक्स 30 अंकांच्या किरकोळ वाढीसह व्यवहार करत होता. निफ्टी 25,000 च्या खालीच राहिला, तर बँक निफ्टीमध्ये 235 अंकांची वाढ झाली.