
भारतीय बाजारात तेजी: IMF ने भारताच्या GDP ग्रोथचा अंदाज वाढवल्याने आणि कंपन्यांचे चांगले निकाल आल्याने बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
देशांतर्गत गुंतवणूकदारांची खरेदी: परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली असली तरी देशांतर्गत संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत बाजाराला आधार दिला.
IPO आणि धोरणात्मक घडामोडी: NSDLसह अनेक कंपन्यांचे IPO खुले झाले असून RBI व SEBIकडून नियमांमध्ये महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.
Stock Market Opening Today: आज बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. सेन्सेक्स 257 अंकांनी वाढून 81,594 वर उघडला. निफ्टी 69 अंकांनी वाढून 24,890 वर उघडला. बँक निफ्टी 88 अंकांनी वाढून 56,310 वर उघडला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर, आज निफ्टीच्या आयटी, मीडिया, मेटल, फार्मा आणि पीएसयू बँकांमध्ये खरेदी दिसून येत आहे. तर ऑटो, एफएमसीजी आणि खाजगी बँकांमध्ये विक्री झाली आहे.