
Stock Market Opening Today: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत आहे. गेल्या आठवड्यात बाजार 1 टक्क्यांहून अधिक घसरला होता. एकीकडे इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे जग चिंतेत आहे.
त्याच वेळी, त्याचा भारतीय बाजारावर होणारा परिणाम आता हळूहळू कमी होत आहे. आज सेन्सेक्स 73 अंकांनी वाढून 81,869 वर उघडला. निफ्टी 31 अंकांनी वाढून 24,977 वर उघडला. बँक निफ्टी देखील 31 अंकांनी वाढून 55,975 वर उघडला.