
Stock Market Today: महागाईच्या चांगल्या बातमीमुळे आज बाजाराचा उत्साह वाढला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर, आज बाजार पुन्हा हिरव्या रंगात उघडला. सेन्सेक्स 130 अंकांच्या वाढीसह 81,278 वर उघडला. निफ्टी 35 अंकांनी वाढून 24,613 वर उघडला. बँक निफ्टी 68 अंकांनी वाढून 55,008 वर उघडला. क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचे झाले तर, आज आयटी आणि मेटलमध्ये वाढ दिसून आली. तर ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री झाली.