
आज भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात करत सेन्सेक्स 254 अंकांनी आणि निफ्टी 75 अंकांनी वाढला.
आयटी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.
जागतिक तेजी, व्याजदर कपातीच्या अपेक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील मोठ्या डीलमुळे बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
Stock Market Opening Today: आज भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स तब्बल 254 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता, तर निफ्टी 75 अंकांनी वाढला. बँक निफ्टीतही खरेदी झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यामध्ये आयटी इंडेक्स सुमारे दीड टक्क्यांनी वाढला.