
Stock Market Closing Today: सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराला ब्रेक लागला. आज बुधवारी शेअर बाजारात कमालीची वाढ झाली. BSE सेन्सेक्स 740.30 अंकांनी वाढून 73,730.23 वर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी देखील 254.65 अंकांनी वधारला. निफ्टी 22,337.30 अंकांवर बंद झाला. बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली.