
अमेरिकेत फक्त 73,000 नवीन नोकऱ्या तयार झाल्या, डोनाल्ड ट्रम्प यांनी लेबर कमिश्नरला काढले.
सेन्सेक्स 166 अंकांनी वधारला, पण बँकिंग शेअर्समध्ये दबाव. BEL, Tata Steel टॉप गेनर्स; SBI, TechM टॉप लूजर्स.
आजपासून RBI ची बैठक सुरू – व्याजदराबाबत बुधवारी निर्णय.
Stock Market Opening Today: आज शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. बीएसई सेन्सेक्सने 166 अंकांची वाढ घेतली आणि 80,765 या पातळीवर उघडला. तर निफ्टीही 31 अंकांनी वधारत 24,596 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, बँक निफ्टीमध्ये सौम्य घसरण दिसून आली. हा निर्देशांक 60 अंकांनी घसरून 55,557 वर उघडला. रुपयाच्या व्यवहारातही सौम्य वाढ दिसली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 87.54 वरून घसरून 87.22 वर उघडला.