
थोडक्यात:
शेअर बाजारात आज दिवसभर संमिश्र व्यवहार झाला असून सेन्सेक्स 247 अंकांनी, तर निफ्टी 67 अंकांनी खाली घसरले.
आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली, तर फार्मा आणि सरकारी बँका गुंतवणूकदारांसाठी आकर्षण ठरल्या.
BSE वरील कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप एकाच दिवसात 96,000 कोटी रुपयांनी वाढले.
Stock Market Closing Today: शेअर बाजारात आज दिवसभर संमिश्र वातावरण पाहायला मिळालं. सकाळी बाजाराने सपाट सुरुवात केली, पण व्यवहार सुरू झाल्यानंतर काही तासांतच विक्रीचा दबाव वाढला. दिवसाअखेर सेन्सेक्स 247 अंकांनी घसरून 82,253 वर बंद झाला, तर निफ्टी 67 अंकांनी घसरून 25,082 वर बंद झाला.