
Stock Market Opening Today: शेअर बाजारात सलग दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला आहे. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात म्हणजेच शुक्रवारी बाजाराने घसरणीसह सुरुवात केली. सेन्सेक्स 140 अंकांनी घसरणीसह उघडला, तर निफ्टीही सुमारे 50 अंकांनी खाली घसरला. आयटी शेअर्समध्ये सुरू असलेल्या विक्रीमुळे बाजारावर दबाव होता.
सकाळी साडेनऊच्या सुमारास बाजारात वाढ दिसली आणि निर्देशांक पुन्हा हिरव्या रंगाकडे सरकला. निफ्टी 25,590 च्या आसपास स्थिर होता, तर सेन्सेक्स 11 अंकांनी खाली येऊन 83,455 वर होता. बँक निफ्टी मात्र 13 अंकांच्या किरकोळ वाढीसह 57,431 वर ट्रेड करत होता.