
Stock Market Opening Today: दोन दिवसांच्या सततच्या विक्रीनंतर अखेर परदेशी गुंतवणूकदार (FIIs) गुरुवारी बाजारात पुन्हा परतले आणि त्याच क्षणी बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, तर निफ्टीने 25,400 ची पातळी गाठली. बँक निफ्टीतही तब्बल 300 अंकांची वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही सकाळपासूनच खरेदीचा जोर होता. निफ्टीवरील खासगी बँक इंडेक्स तब्बल 1 टक्क्यांनी वधारला. आयटी शेअर्समध्ये विक्री दिसली असली, तरी बाकी सर्व क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे.