
जीएसटी परिषदेच्या निर्णयांनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ झाली.
सेंसेक्सने 81,000 पार करत 81,456 वर आणि निफ्टीने 24,980 वर झेप घेतली.
एफएमसीजी, ऑटो, विमा व कंझ्युमर ड्युरेबल कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले.
Stock Market Opening Today: जीएसटी परिषदेच्या बैठकीत कर स्लॅब बदलांपासून ते दर कपातीपर्यंतच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आज भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त उत्साह दाखवला. जागतिक बाजारातून आलेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बाजाराने दिवसाची सुरुवातच जोरदार वाढीसह केली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेंसेक्स 81,000 अंकांच्या वर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 150 अंकांनी वाढला.