
Stock Market Closing Today: शेअर बाजारात शुक्रवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1,049.42 अंकांनी वधारून 82,411.29 वर पोहोचला, तर निफ्टी 325.80 अंकांनी वाढून 25,119.05 वर स्थिरावला. या तेजीमागचं मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी आणलेलं नवं धोरण.
आता अंडर-कन्स्ट्रक्शन प्रकल्पांवर बँकांना जास्त रक्कम राखून ठेवावी लागणार नाही. म्हणजेच, बँका आणि NBFCs कडून जास्त कर्ज देणं शक्य होणार आहे – विशेषतः वीज, घरबांधणी, रस्ते आणि रेल्वे क्षेत्रात.