
शेअर बाजारात मोठी घसरण: ट्रम्प यांच्या 25% टॅरिफ निर्णयामुळे निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही खाली आले.
कंपन्यांवर थेट परिणाम: कापड, अभियांत्रिकी आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. निर्यातप्रधान कंपन्यांवर ताण वाढला आहे.
काही शेअर्स तेजीत: FMCG आणि निवडक बँकिंग शेअर्सनी बाजाराला आधार दिला. हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC, कोटक बँक इ. शेअर्स तेजीत होते.
Stock Market Closing Today: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 25% कर लादल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारात तीव्र चढ-उतार दिसून आले. निफ्टी 100 अंकांनी घसरून 24750च्या जवळ बंद झाला. सेन्सेक्स 296 अंकांनी घसरून 81,185.58
च्या जवळ बंद झाला. बँक निफ्टी 200 अंकांनी घसरून 55,950 च्या जवळ बंद झाला. मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एफएमसीजी क्षेत्रात मोठी खरेदी झाली, ज्यामुळे बाजाराला आधार मिळाला.