Stock Market opening
Sakal
Indian Stock Market Today : भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे सत्र गुरुवारच्या दिवशीही कायम राहिले. आज बाजार उघडताच सेन्सेक्स 120 अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 25,800 अंकांपर्यंत खाली आला. सेक्टरनिहाय पाहता, आयटी क्षेत्र वगळता इतर सर्व सेक्टर निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते. सोबतच BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरताना दिसत होते.