Share Market Closing: शेअर बाजाराने केले कमबॅक! सेन्सेक्स-निफ्टी 3 टक्क्यांनी वाढले; कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing: लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान शेअर बाजारात मोठ्या घसरणीनंतर आज बुधवारी (5 जून) बाजारात चांगलीच रिकव्हरी दिसून येत आहे. दुपारी 2.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स सुमारे 2,200 अंकांच्या घसरणीसह 74,200 पार करत होता.
Share Market
Share Market Sakal

Share Market Closing Latest Update 5 June 2024: बुधवारी शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक प्रत्येकी 3% वाढीसह बंद झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान शेअर बाजारात मोठ्या घसरणीनंतर आज बुधवारी (5जून) बाजाराने चांगली रिकव्हरी दाखवली.

दिवसाच्या वरच्या पातळीच्या जवळ बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी 735 अंकांनी वाढून 22,620 वर बंद झाला आणि सेन्सेक्स 2303 अंकांनी वाढून 74,382 वर बंद झाला. निफ्टी बँक 2126 अंकांनी वाढून 49,054 वर बंद झाला.

मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप 2115 अंकांच्या वाढीसह 51,266 वर बंद झाला आणि स्मॉलकॅप 597 अंकांच्या वाढीसह 16,289 वर बंद झाला.

Share Market Closing
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

भारतीय बाजारपेठेत एफएमसीजी, बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल, ऊर्जा, तेल आणि गॅस, आरोग्यसेवा, कंज्यूमर ड्यूरेबल्स यासारख्या क्षेत्रांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. याशिवाय मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली, ज्यामुळे निफ्टी मिडकॅप निर्देशांक 2115 अंकांच्या वाढीसह बंद झाला आणि स्मॉल कॅप निर्देशांक 600 अंकांच्या वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स वाढीसह बंद झाले.

Share Market
Mukesh Ambani: मुकेश अंबानींचा मेगा प्लॅन! नवी मुंबईत घेतली 3,750 एकर जमीन; इतक्या हजार कोटींची झाली डील
Share Market Closing
Share Market TodaySakal

PSU मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती

शेअर बाजारातील तेजीच्या काळात, कंटेनर कॉर्पोरेशन, माझगाव डॉक, कोल इंडिया, भेल, एनटीपीसी, गेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयआरएफसी, आयआरसीटीसी, इरकॉन इंटरनॅशनल, आरव्हीएनएल आणि एचएएल यांच्या शेअ्रर्सनी वाढ नोंदवली.

तर BEML लिमिटेड, RITES लिमिटेड, Titagarh Rail, Cochin Shipyard आणि Garden Reach या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

Share Market Closing
BSE SENSEXSakal

गौतम अदानी यांचे दोन शेअर पडले

गौतम अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी दोन कंपन्यांचे शेअर्स घसरणीत बंद झाले तर आठ कंपन्यांचे शेअर्स वधारले. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 11 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत नाल्को, पतंजली, देवयानी, सेल, फेडरल बँक, अशोक लेलँड, हिंदुस्तान झिंक, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुथूट फायनान्सच्या शेअर्सनी वाढ नोंदवली. बुधवारी एनएचपीसी लिमिटेडसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Share Market
TV Channel Rates: 'अब की बार महंगाई की मार'; आता टीव्ही पाहणेही होणार महाग, चॅनलचे दर लवकरच वाढणार

मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ

मंगळवारी भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 31 लाख कोटी रुपयांची घसरण झाली. पण बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली.

बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप पुन्हा 400 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे आणि 407.58 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. जे गेल्या सत्रात 394.83 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 12.75 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com