

Stock Market Crash: Sensex Tanks 600 Points After Trump’s Iran Threat!
eSakal
Sensex and Nifty 50 Today: कालच्या तेजीनंतर आज मात्र भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. पश्चिम आशियात अमेरिका-इराण यांच्यातील संबंधांबाबत वाढलेल्या तणावाचा थेट परिणाम बाजारावर दिसून आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत लवकरच करार न झाल्यास मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली असून गुंतवणूकदार महागाई वाढण्याच्या शक्यतेने सावध झाले आणि बाजारावर दबाव वाढला.