Share Market Closing: शेअर बाजार किंचित वाढीसह बंद; मेटल आणि फार्मा सेक्टरचा दबाव, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: शेअर बाजाराने मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदवली. बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळाला. सकाळपासूनच बाजारात तेजी होती. पण शेवटी मेटल आणि फार्मा सेक्टरच्या दबावामुळे बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
Stock market today Sensex, Nifty 50 end in the green for 3rd straight session; India VIX falls
Stock market today Sensex, Nifty 50 end in the green for 3rd straight session; India VIX falls Sakal

Share Market Closing Latest Update 23 April 2024: शेअर बाजाराने मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदवली. बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळाला. सकाळपासूनच बाजारात तेजी होती. पण शेवटी मेटल आणि फार्मा सेक्टरच्या दबावामुळे बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 89 अंकांनी वधारून 73,738 वर बंद झाला. निफ्टी 31 अंकांनी वाढून 22,368 वर बंद झाला.

Share Market Today
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅपने एक टक्क्याहून अधिक वाढ नोंदवली तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकही वाढीसह बंद झाले.

Share Market Today
Share Market TodaySakal

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, एचसीएल टेक, टाटा मोटर्स आणि एनटीपीसी या शेअर्सचा समावेश होता. शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये सन फार्मा, बीपीसीएल, आरआयएल, महिंद्रा, हिंदाल्को, डॉ रेड्डीज आणि एचडीएफसी लाईफ यांचा समावेश होता.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal
Stock market today Sensex, Nifty 50 end in the green for 3rd straight session; India VIX falls
Bank Disinvestment: मोदी सरकार 'या' 5 सरकारी बँकांमधील हिस्सा विकण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.83 लाख कोटी रुपयांची वाढ

आजच्या व्यवहारादरम्यान, BSE वर कंपन्यांचे बाजार भांडवल पुन्हा 400 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. मात्र, शेवटच्या तासात झालेल्या घसरणीमुळे बाजार भांडवल या पातळीच्या खाली आले.

आजच्या व्यवहाराच्या शेवटी बाजार भांडवल 399.68 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, तर मागील ट्रेडिंग सत्रात ते 397.85 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.83 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Stock market today Sensex, Nifty 50 end in the green for 3rd straight session; India VIX falls
Jobs: लोकसभा निवडणुकीत 9 लाख कंत्राटी नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता; उद्योग तज्ज्ञांचा दावा

मारुती सुझुकी विक्रमी उच्चांकावर

मारुती सुझुकीच्या शेअर्सने मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठला. स्टॉक इंट्राडे 1.87% वाढला आणि 13,024.50 वर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 26.3% वाढले आहेत. गेल्या 12 महिन्यांत शेअर 51.5% वाढला आहे. व्यवहाराच्या शेवटी, शेअर 1.48% वाढून 12,975 वर बंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com