stock market opening
Sakal
Indian Stock Market Today : बुधवारी भारतीय शेअर बाजाराने सौम्य वाढीसह सुरुवात केली. कालच्या दिवसात पहिल्यांदा घसरण झाल्यानंतर दिवसाच्या शेवटी शेअर बाजार सपाट पातळीवर बंद झाला होता. मात्र, आजच्या दिवशी सकाळच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये १०० अंकांची वाढ होऊन ८५,६३५ वर तर निफ्टी निर्देशांक ३६ अंकांची वाढ होऊन २६,२१४ अंकांवर व्यवहार करत होते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला.