
Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी किंचित वाढीसह व्यापाराला सुरुवात केली होती. मात्र, शेवटच्या काही तासांत बँकिंग आणि रिअल्टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीमुळे शेवटी बाजार घसरला.
अमेरिका आणि भारतामधील संभाव्य व्यापार कराराची चर्चा सुरू असल्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसले. हा करार झाल्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लादू पाहत असलेल्या टॅरिफपासून भारताला काहीसा दिलासा मिळू शकतो.