

Stock Market Closing Latest Update 13 December 2024: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारचा दिवस प्रचंड अस्थिरतेचा होता. बाजाराची सुरुवात घसरणीने झाली, मात्र यानंतर निर्देशांक दीड टक्क्यांनी घसरताना दिसला.
पण शेवटी जबरदस्त रिकव्हरी झाली, मोठ्या घसरणीनंतर बाजार रिकव्हरीसह बंद झाला. निफ्टी 219 अंकांनी वाढून 24,768 वर बंद झाला. सेन्सेक्स 843 अंकांनी वाढून 82,133 वर आणि निफ्टी बँक 367 अंकांनी वाढून 53,583 वर बंद झाला.