
सलग सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक; आज बाजारात मोठी घसरण.
सेन्सेक्स 694 अंकांनी कोसळून 81,306 वर, तर निफ्टी 24,900च्या खाली आला.
FMCG आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री
Stock Market Closing Today: आठवड्याच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. सलग 6 दिवसांची तेजी थांबली आणि गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंगला प्राधान्य दिले. सकाळी बाजार सुस्त उघडला होता. मात्र काही तासापासूनच प्रॉफिट बुकिंगचा दबाव दिसू लागला. FMCG आणि NBFC शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली.