
आजच्या व्यवहारात आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली, इन्फोसिस आणि टीसीएस आघाडीवर राहिले.
निफ्टी आयटी निर्देशांक तब्बल 2.50% वाढला, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही बळ मिळाले.
जीएसटी सुधारणा, फेडरल रिझर्व्हची बैठक आणि भारत-चीन संबंधांतील सुधारणा यामुळे बाजारात तेजी पाहायला मिळाली.
Stock Market Closing Today: शेअर बाजारात आज पुन्हा तेजीचं वातावरण पाहायला मिळालं. आज सेन्सेक्स 213 अंकांनी वाढून 81,857 वर बंद झाला. निफ्टीही 69 अंकांनी वाढून 25,050 च्या वर स्थिरावला. मात्र, बँक निफ्टी 166 अंकांनी घसरून 55,698 वर बंद झाला. रुपया 87.07 वर सपाट बंद झाला.