Why Market Fall: शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच; 6 दिवसात 20 लाख कोटींचे नुकसान, काय आहेत कारणे?

Why Market Fall: शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी मोठी घसरण झाली.
Stock market Why Sensex crashed 3,000 points in six days investors losses over 14 lakh crore know reasons explained
Stock market Why Sensex crashed 3,000 points in six days investors losses over 14 lakh crore know reasons explained Sakal

Why Market Fall: शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी मोठी घसरण झाली. या सहा दिवसांत गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. बाजारातील ही घसरण केवळ मध्यपूर्वेतील राजकीय तणावामुळेच नाही, तर याशिवाय अमेरिकेतील रोखे उत्पन्नात झालेली वाढ आणि मोठ्या कंपन्यांच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालांमुळे झाली आहे.

देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाबद्दल बोलायचे झाल्यास, आज बीएसई सेन्सेक्स 64 हजारांनी घसरला आणि निफ्टी 50 देखील 19,100 च्या खाली घसरला. ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही.के. विजयकुमार यांच्या मते, इस्रायल-हमास युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता नजीकच्या काळात बाजारावर दबाव आणेल.

गेल्या सहा दिवसांत गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटी बुडाले

गेल्या सहा दिवसांत गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. केवळ गुरुवारीच सुरुवातीच्या घसरणीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5 लाख कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली. बुधवारी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 309.22 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे बीएसई मार्केट कॅप कमी होत गेले

  • 17 ऑक्टोबर: 3.29 लाख कोटी रु

  • 18 ऑक्टोबर: 3.26 लाख कोटी रु

  • 19 ऑक्टोबर: 3.26 लाख कोटी रु

  • 20 ऑक्टोबर: 3.24 लाख कोटी रु

  • 23 ऑक्टोबर: 3.16 लाख कोटी रु

  • 25 ऑक्टोबर: 3.09 लाख कोटी रु

  • 26 ऑक्टोबर: 3.03 लाख कोटी (सकाळी 10.20 पर्यंत)

बाजारातील घसरणीची प्रमुख कारणे :

इस्राइल-हमास युद्धाची व्याप्ती सातत्याने वाढत असून संपूर्ण मध्यपूर्वेला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढत आहेत आणि ते प्रति बॅरल 90 डॉलरच्या वर आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Stock market Why Sensex crashed 3,000 points in six days investors losses over 14 lakh crore know reasons explained
SEBI Action: सेबीने 'बाप ऑफ चार्टवर' घातली बंदी, 17 कोटी रुपये परत करण्याचे दिले आदेश

गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये FPI ने भारतीय बाजारातून 14,768 कोटी रुपये काढून घेतले. त्याचवेळी, ऑक्टोबरमध्येही विक्री सातत्याने सुरू आहे. या महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 12,000 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. हे विदेशी गुंतवणूकदार फायनान्स, पॉवर, एफएमसीजी आणि आयटीचे शेअर्स विकत आहेत.

Stock market Why Sensex crashed 3,000 points in six days investors losses over 14 lakh crore know reasons explained
Tata Group: कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास उशीर... TCS ला महाराष्ट्र सरकारची कारणे दाखवा नोटीस!

अमेरिकेतील व्याजदरातील बदलांचा परिणाम भारतीय बाजारांवरही होतो. अशा परिस्थितीत अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह बँक (यूएस फेड) ची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. पॉलिसी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा सर्व कारणांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com