
सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; आयटी आणि FMCG शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री, तर PSU बँका तेजीत.
नेस्ले इंडियाचा अपेक्षेपेक्षा कमी निकाल, FII ची ₹4,200 कोटींची विक्री आणि ट्रेंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस यांसारख्या मोठ्या शेअर्समधील घसरणीमुळे बाजारावर दबाव.
निफ्टी आयटी निर्देशांक 2% पेक्षा जास्त घसरला, तर निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही अनुक्रमे 0.58% आणि 1.09% घसरण.
Stock Market Closing Today: शेअर बाजारांमध्ये आज गुरुवारी आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी जोरदार घसरण झाली. सकाळी बाजार सपाट उघडला, पण नंतर लगेचच लाल रंगात सरकत गेला. गेल्या दोन दिवसांपासून असलेली तेजी आज थांबली आणि गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करण्यासाठी विक्री केली.