
भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला असला तरी टायटन, मारुतीसारख्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.
ट्रम्प यांच्या भारतविरोधी टॅरिफ वक्तव्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली.
FII विक्री आणि RBI पॉलिसी बैठकीची प्रतिक्षा यामुळेही बाजारावर दबाव आहे.
Stock Market Closing Today Update: आज दिवसभर बाजारात चढ-उतार सुरू होते, पण शेवटी निर्देशांक लाल रंगात बंद झाले. बीएसई सेन्सेक्स आज 308 अंकांनी घसरून 80,710 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 73 अंकांनी घसरून 24,649 वर स्थिरावला. बँक निफ्टीतही 259 अंकांची घसरण दिसून आली आणि तो 55,360 या पातळीवर बंद झाला.