Share Market : इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये दमदार तेजी; तुमच्याकडे आहे का हा शेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये दमदार तेजी; तुमच्याकडे आहे का हा शेअर

Share Market : इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या (Olectra Greentech) शेअर्समध्ये सध्या शानदार तेजी पाहायला मिळत आहे. सध्या हा शेअर एनएसईवर 667.85 रुपयांवर ट्रेड करत आहे.

त्याच वेळी, इंट्राडेमध्ये त्याची किंमत 672.70 रुपयांवर पोहोचली होती. गेल्या तीन दिवसांत त्याचे शेअर्स 24% वाढले आहेत. कंपनीला इलेक्ट्रिक बसेसच्या सप्लायची ऑर्डर मिळाली आहे.

या ऑर्डरची किंमत सुमारे 1,000 कोटी आहे, त्यामुळेच या शेअर्समध्ये तेजी येत असल्याचे दिसून येत आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला (TSRTC) बसेस पुरवायच्या आहेत.

एवी ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडला (Avee Trans Pvt Ltd (EVEY) 550 इलेक्ट्रिक बसेससाठी TSRTC कडून दोन लेटर ऑफर अवॉर्ड्स (LOAs) मिळाले असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामध्ये इंट्रा-सिटीसाठी 500 बसेस आणि इंटर-सिटीसाठी 50 बसेसचा समावेश आहे.

कंपनीला 12 वर्षांत 500 इलेक्ट्रिक बसेस आणि 10 वर्षांत 50 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करायचा आहे.

हा पुरवठा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) / ओपेक्स मॉडेलच्या आधारे केला जाईल. EVEY या बसेस ओलेक्ट्रा ग्रीनटेककडून खरेदी करेल ज्या 16 महिन्यांच्या कालावधीत डिलिव्हर केल्या जातील.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्समध्ये अलिकडच्या काळात शानदार तेजी दिसून आली आहे. गेल्या 10 दिवसांत त्याच्या शेअर्सनी 68 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 45.10% वाढला आहे.

या वर्षी त्याचे शेअर्स 30 टक्क्यांनी वाढले आहेत. तर गेल्या 20 वर्षांत त्याचे शेअर्स 2,388.35 टक्क्यांनी वाढलेत. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 243.19 टक्के बंपर नफा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.