These 3 Expert-Recommended Stocks Can Deliver 35% Returns
Sakal
Stocks to Buy : नवीन वर्षात शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला आहे. निफ्टी निर्देशांकाने 26,340 चा नवा ऑल-टाइम हाय केला, तर बँक निफ्टीने 60,203.75 पर्यंत मजल मारली. शुक्रवारी परदेशी गुंतवणूकदारांनी 290 कोटी रुपये तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 677 कोटी रुपयांची खरेदी केली. बाजारातील या जोरदार तेजीच्या पार्श्वभूमीवर, शेअर बाजार तज्ञ अंबरीश बलिगा यांनी शॉर्ट टर्म, पोजिशनल आणि लॉन्ग टर्म साठी 3 उत्तम शेअर्स निवडले आहेत. यामध्ये IKIO Technologies, Himadri Speciality Chemical आणि Samhi Hotels यांचा समावेश आहे.