Ion Exchange (India) Ltd. : ऑर्डरच्या बातमीनंतर या कंस्ट्रक्शन स्टॉकमध्ये दमदार ऍक्शन, 2 वर्षात 150 टक्के परतावा...

शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात चढउतार सुरु आहेत. या चढउतारांदरम्यान, सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी आयन एक्सचेंजच्या शेअर्समध्ये मोठी ऍक्शन दिसून येत आहे.
Strong action in this construction stock after order news 150 percent return in 2 years
Strong action in this construction stock after order news 150 percent return in 2 years Sakal

Ion Exchange (India) Ltd. - शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात चढउतार सुरु आहेत. या चढउतारांदरम्यान, सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी आयन एक्सचेंजच्या शेअर्समध्ये मोठी ऍक्शन दिसून येत आहे. बीएसईवर हा शेअर 3.57 टक्क्यांनी वाढून इंट्रा-डे उच्चांक 465.25 रुपयांवर पोहोचला.

ऑर्डर मिळाल्याच्या बातमीनंतर या कंस्ट्रक्शन स्टॉकमध्ये वाढ दिसून आली. आयन एक्सचेंजला (Ion Exchange) सौदी अरेबियातील मदिना इथून 120 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आयन एक्सचेंज शेअरने 2 वर्षांत गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बांधकाम कंपनी आयन एक्सचेंजला सौदी अरेबियातील मदिना इथून 120 कोटीची ऑर्डर मिळाली आहे.

बांधकाम कंपनीने मदिनाजवळच्या सर्वात मोठ्या खाण कंपनीसाठी जलशुद्धीकरण प्रकल्पासह डिमिनरलायझेशन प्लांट उभारायचा आहे. त्याची एकूण किंमत 120 कोटी आहे. हा प्रोजेक्ट LoA प्राप्त झाल्यापासून एक वर्षाच्या आत पूर्ण करायचा आहे.

आयन एक्सचेंज ही कंपनी बी2बी सोल्यूशन्सवर काम करते. आयन एक्सचेंज 1964 पासून कार्यरत आहे. आयन एक्सचेंजच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 687.55 रुपये आहे आणि नीचांक 303.20 रुपये आहे.

कंपनीने गेल्या वर्षी जूनमध्ये स्टॉक स्प्लिट केले होते. तर 30 ऑगस्ट 2023 रोजी 1.25 रुपयांचा लाभांश दिला होता. आयन एक्सचेंजचे मार्केट कॅप 6,746.66 कोटी आहे. एका वर्षात आयन एक्सचेंज शेअर किंमतीचा परतावा 34 टक्के आहे. 2 वर्षात स्टॉक 150 टक्के वाढला आहे. सध्या हा शेअर 458.10 रुपयांवर ट्रेड करत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com