IPO News Update : आयपीओसाठी स्विगीला शेअरहोल्डर्सकडून मंजूरी ; मेगा आयपीओसाठी तयारी सुरु...

फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगी (Swiggy) आपला मेगा आयपीआ लाँच करण्याच्या तयारीत आहे. तब्बल 1.2 अब्ज डॉलरचा आयपीओ लाँच करण्यासाठी त्यांना शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळाली आहे.
IPO News Update
IPO News Updatesakal

फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगी (Swiggy) आपला मेगा आयपीआ लाँच करण्याच्या तयारीत आहे. तब्बल 1.2 अब्ज डॉलरचा आयपीओ लाँच करण्यासाठी त्यांना शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळाली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे (RoC) सादर केलेल्या नियामक फायलिंगनुसार, स्विगीने आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करून 3,750 कोटी आणि ऑफर फॉर सेलद्वारे 6,664 कोटी उभारण्याची योजना आखली आहे. स्विगी त्याच्या मेगा आयपीओसाठी तयारी करत असल्याचे मार्च 2022 मध्ये पहिल्यांदा समजले होते.

कंपनीने आयपीओच्या आधी अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे 750 कोटी उभारण्याची योजना आखत असल्याचे सुत्रांकडून समजत आहे. स्विगीची असाधारण सर्वसाधारण सभा (EGM) 23 एप्रिलला झाली. याच ईजीएममध्ये स्विगीने श्रीहर्ष मजेटी आणि नंदन रेड्डी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली. मजेटी यांची व्यवस्थापकीय संचालक आणि ग्रुप सीईओ म्हणून, तर रेड्डी यांची संपूर्ण वेळ डायरेक्टर आणि इनोव्हेशनचे प्रमुख असतील.

IPO News Update
Share Market Today: अमेरिकेचा जीडीपी घसरला; भारतीय बाजारांवर परिणाम होणार का?

स्विगीने अलीकडेच सांगितले की ते स्विगी मॉलला त्यांच्या क्विक कॉमर्स बिझनेस इंस्टामार्टशी (Instamart) जोडेल. ग्राहकांना किराणा मालाच्या पलीकडे वस्तूंची विस्तृत निवड देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्विगी मॉल सध्या बंगळुरूच्या काही भागात कार्यरत आहे. स्विगी इंस्टामार्ट 25 हून अधिक शहरांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि आगामी काही महिन्यांत स्विगी मॉलचा विस्तार होईल आणि याची सुरुवात बेंगळुरूपासून होणार आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com