
Tata Capital IPO: 2025 ची सुरुवात शेअर बाजारासाठी काहीशी संथ राहिली, मात्र मागील 2-3 महिन्यांमध्ये बाजारात जोरदार वाढ झाली आहे. त्याचबरोबर IPOचंही वातावरण तापलं आहे. आतापर्यंत 20 हून अधिक कंपन्यांनी आपले IPO बाजारात आणलेत, पण आता टाटा समूहाने वर्षातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी केली आहे. बाजार नियामक SEBI कडूनही या IPO ला मंजुरी मिळाली आहे. टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनीचा हा IPO 2025 च्या शेवटी येण्याची शक्यता आहे.