

Tata Group Stocks: आज बाजार उघडताच टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्सचे शेअर्स कोसळले. कंपनीला Q3FY25 मध्ये 21 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 194 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
यामुळे, बाजार उघडताच कंपनीचा शेअर बीएसईवर 4% घसरून 906.65 रुपयांवर आला. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नवा नीचांक आहे. दरम्यान, सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी वाढला आहे.