Tata Motors: टाटा मोटर्सला यूपी सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्समध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता

Tata Motors: टाटा मोटर्सला (Tata Motors) उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (UPSRTC) डिझेल बस चेसिसच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरनुसार टाटा मोटर्स 1350 युनिट्सचा डिझेल बस चेसिसच्या पुरवठा करेल.
Tata Motors bags order to provide 1350 diesel bus Shares rise
Tata Motors bags order to provide 1350 diesel bus Shares rise Sakal

Tata Motors: टाटा मोटर्सला (Tata Motors) उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (UPSRTC) डिझेल बस चेसिसच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरनुसार टाटा मोटर्स 1350 युनिट्सचा डिझेल बस चेसिसच्या पुरवठा करेल.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, हे कंत्राट कंपनीच्या टाटा एलपीओ 1618 डिझेल बस 'चेसिस'साठी देण्यात आले आहे. जे इंटरसिटी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले आहे.

कंपनीचे शेअर्स मंगळवारी 0.65 टक्क्यांनी घसरले असून शेअर 720 रुपयांवर बंद झाला. पण या ऑर्डरची बातमी बाजार बंद झाल्यानंतर आली, त्यामुळे बाजार सुरु होताच टाटा मोटर्सच्या शेअर्सवर चांगला परिणाम दिसून येईल. या वर्षाचा विचार केल्यास टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 82 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे.

Tata Motors bags order to provide 1350 diesel bus Shares rise
'या' सरकारी कंपनीने जिंकली 900 MW सोलर प्रोजेक्ट्ससाठीची बोली; 1 वर्षात दिला 85 टक्के परतावा

बसची ‘चेसिस’ टप्प्याटप्प्याने पुरवली जाईल. टाटा मोटर्सने आतापर्यंत अनेक राज्यांना आणि सार्वजनिक वाहतुकीला 58,000 हून अधिक बसेसचा पुरवठा केल्याचे कंपनीने सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला, देशातील दिग्गज व्यावसायिक वाहन कंपनी अशोक लेलँडलाही तामिळनाडू सरकारकडून 552 अल्ट्रा-लो एंट्री (ULE) डिझेल नॉन-एसी बसेस प्रदान करण्याची ऑर्डर मिळाली होती. कंपनी एप्रिल 2024 पासून बसेसची डिलीव्हरी सुरू करेल.

Tata Motors bags order to provide 1350 diesel bus Shares rise
Multibagger Stock: रेल्वेच्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल! सलग 8 व्या दिवशी अपर सर्किट

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com