

N Chandrasekaran’s U-Turn? Reappointed as Chairman; Tata Shares Jump 5% After the Decision
eSakal
N Chandrasekaran’s News: टाटा सन्स (Tata Sons) च्या बोर्डाने एन. चंद्रशेखरन यांना कार्यकारी अध्यक्षपदासाठी आणखी पाच वर्षांची मुदत देण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या महिन्यातच चंद्रशेखरन यांनी सध्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे बोर्डाच्या ताज्या निर्णयाने त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत सुरू झालेल्या चर्चेला सध्या विराम मिळाला आहे.
चंद्रशेखरन यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे. मात्र त्यांच्या नव्या मुदतवाढीमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.