
New Boss of the Stock Market: तुम्ही कधी विचार केलाय का, की अर्थव्यवस्थेसाठी तेल इतकं महत्त्वाचं का आहे? गेल्या 15-20 वर्षांपूर्वी तेलाच्या किंमतीत थोडीशी वाढ झाली, की सगळं जग हादरायचं. शेअर बाजार घसरायचा. कारण तेल हे जगाच्या अर्थव्यवस्थेचं इंधन होतं. कारखाने, वाहनं, विमानं, सगळं तेलावर चालायचं. तेलाच्या किंमती वाढल्या, की उत्पादनाचा खर्च वाढायचा. मालाची किंमत वाढायची आणि याचा थेट परिणाम शेअर बाजारावर व्हायचा.