IPO News : टोलिन्स टायर्सचा आयपीओ येणार ; सेबीकडे पेपर्स दाखल...

टायर आणि ट्रेड रबर उत्पादक कंपनी टोलिन्स टायर्सने (Tolins Tyres) 230 कोटींचा आयपीओ उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीने बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे सादर केली आहेत.
Tolins Tyres
Tolins Tyressakal

टायर आणि ट्रेड रबर उत्पादक कंपनी टोलिन्स टायर्सने (Tolins Tyres) 230 कोटींचा आयपीओ उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीने बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे सादर केली आहेत. आयपीओमध्ये 200 कोटीचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. प्रमोटर्सकडून 30 कोटीची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. प्रमोटर कलामपारंबिल वर्की टोलिन आणि त्यांची पत्नी जेरिन टोलिन हे ओएफएसमधील शेअर्स विकतील. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 15 कोटीचे शेअर्स विक्रीसाठी ऑफर केले जातील.

टोलिन्स टायर्समध्ये सध्या प्रमोटर्सचे 92.64 टक्के शेअर्स आहेत. उर्वरित 7.36 टक्के शेअर्स सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे आहेत. कंपनी रजिस्ट्रारकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी प्री-आयपीओ प्लेसमेंटमध्ये 25 कोटी उभारू शकते. सॅफ्रॉन कॅपिटल ऍडव्हायझर्ससाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

कंपनी आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करण्यापासून उभारलेल्या पैशाचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि लॉन्ग टर्म वर्किंग कॅपिटलच्या गरजांसाठी करेल. जानेवारी 2024 पर्यंत त्यांच्यावर एकूण कर्ज 95.09 कोटी होते. कंपनीने त्याच्या पूर्ण मालकीच्या टोलिन रबर्समध्ये 24.37 कोटीची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या रकमेपैकी 16.37 कोटी उपकंपनीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि 8 कोटी वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जातील. आयपीओमधून येणारे काही पैसे सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी ठेवले जाणार आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com